महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

4th National Masters Game : जलतरण स्पर्धेत ठाण्यातील 55 वर्षाच्या जलपरीने पटकावली 5 पदकं - जलतरणपट्टू रेखा गुप्ता

तिरुअनंतपुरम येथे झालेल्या, चौथ्या नॅशनल मास्टर्स गेममध्ये रेखा गुप्ता ( swimmer Rekha Gupt ) यांनी पाच सुवर्ण पदके पटकावली आहेत. रेखा गुप्ता यांनी अनेक स्पर्धांमध्ये विविध प्रकारे भाग घेतला आहे. रेखा गुप्ता यांच्या नावे दोनशेहून अधिक पुरस्कार आहेत. रेखा गुप्ता यांनी आपल्या लग्नानंतर हे सर्व पदके पटकावली आहेत.

Rekha Gupta
Rekha Gupta

By

Published : May 27, 2022, 9:16 PM IST

ठाणे:लहानपणा पासूनच पोहण्याची आवड असलेल्या ठाण्यातील जलपरी रेखा गुप्ता यांनी नुकत्याच तिरुअनंतपुरम ( 4th National Masters Game at Thiruvananthapuram ) येथे झालेल्या, चौथ्या नॅशनल मास्टर्स गेममध्ये पाच सुवर्ण पदके पटकावली ( swimmer Rekha Gupta wins five gold ) आहेत. रेखा गुप्ता यांनी अनेक स्पर्धांमध्ये विविध प्रकारे भाग घेतला आहे. रेखा गुप्ता यांच्या नावे दोनशेहून अधिक पुरस्कार आहेत. रेखा गुप्ता यांनी आपल्या लग्नानंतर हे सर्व पदके पटकावली आहेत. लग्नानंतर कुटुंबियांचा असणारा पाठिंबा यामुळे अनेक ठिकाणे स्पर्धा जिंकून त्यांनी ठाण्याचे देखील नाव लौकिक केला आहे.


लग्नानंतर सुरु केलेल्या या प्रवासामध्ये खूप वेळा प्रॅक्टिस करून सुरुवातीला मी राज्यस्तरीय स्पर्धा खेळू लागले. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेत. माझं प्रामुख्याने लक्ष ओपन वॉटर स्पर्धेमध्ये होतं अनेक ओपन वॉटर स्पर्धेमध्ये मी नामांकनं पटकावली आहेत. स्पर्धेत 19 किलोमीटर ओपन वॉटर स्पर्धा, सहा किलोमीटर स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. मुंबईत असलेली संक्रॉप्ट ते गेटवे आणि दुबई येथे असलेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल देखील जिंकले आहे. तसेच बेला टन आणि इटली येथील स्पर्धा जिंकलेल्या आहेत.

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे 18 ते 22 मे दरम्यान चौथ्या नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये रेखा गुप्ता यांनी 50 मीटर्स बॅक स्ट्रोक, 100 आणि 200 मीटर्स फ्री स्टायल, 4 बाय 50 मीटर्स फ्री स्टायल रिले आणि मेडली रिले अशा पाच प्रकारांत पाच सुवर्ण पदके पटकावली आहेत. तर या सर्व स्पर्धेच्या विजयामधून राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. या स्पर्धाच नव्हे तर आजपर्यंत हजारो मुला-मुलींना स्विमिंग रेखा यांनी शिकवले आहे. समाजातील गरजू आणि गरीब मुलांना स्विमिंग शिकवण्याचे स्वप्न आहे, असे यावेळी रेखा गुप्ता या बोलत होत्या. तसेच भविष्यात चॅनल स्विमिंग करण्याची इच्छा यावेळी रेखा गुप्ता यांनी बोलून दाखवली. पोहण्याचे अनेक फायदे आहेत. स्विमिंग केल्यामुळे अनेक रोगांवर देखील निदान होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने स्विमिंग करावे, असे आवाहन देखील यावेळी रेखा गुप्ता नागरिकांना केले.


रेखा गुप्ता यांनी मिळवलेल्या या यशामुळे ठाण्याचे नावलौकिक नक्कीच एक वेगळा स्तरावरती असणारच आहे. परंतु ठाण्यातील असंख्य गरिब अनाथ आणि गरजू मुलांना जर होण्याचं उत्तम शिक्षण मिळाले तर नक्कीच ठाण्यातील अनेक मुलं नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धामध्ये भाग घेऊन एक नावलौकिक करू शकतात त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेखा सांगत आहेत.


दोन्ही मुले नॅशनल स्वीमर -

रेखा गुप्ता यांना दोन मुले आहेत. कॅपटन विवेक गुप्ता आणि कॅपटन विशाखा गुप्ता हे दोघेही लहान पासून स्विमिंगची आवड असल्याने राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्पर्धेत मेडल पटकावली आहेत. आता हे दोघेही खासगी कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करत आहेत.



पोहणे हा उत्तम व्यायाम -

पोहणे हा सर्वात उत्तम व्यायाम असल्याचे रेखा गुप्ता सांगतात पोहल्यामुळे शरीरातल्या अनेक व्याधी आणि मज्जासंस्थेच्या आजारांना दूर करण्यासाठी मदत होते. म्हणून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी पोहले पाहिजेत, असं रेखा गुप्ता सांगतात. आतापर्यंत हजारो लोकांना स्विमिंग शिकवणाऱ्या रेखा गुप्ता यांनी भविष्यात गरीब विद्यार्थ्यांसाठी अकादमी काढणार असल्याचे ही गुप्तां यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Ketki Chitale Bail Rejected : केतकीचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला

ABOUT THE AUTHOR

...view details