नवी दिल्ली -यंदाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. कतारमधील दोहा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी २५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतून उंच उडी स्पर्धेतील भारताचा खेळाडू तेजस्वनी शंकर याने माघार घेतली आहे.
हेही वाचा -दीपिका, अनुष्कामध्ये हॉट कोण.. या प्रश्नावर जसप्रीत बुमराहने दिले 'हे' उत्तर
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाला (एएफआय) शंकरने याबाबत माहिती दिली. एएफआयने त्यानंतर एक पत्रक काढून शंकर या स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर केले. 'अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या तेजस्वनी शंकरने आम्हाला सांगितले आहे की, तो सध्या त्याच्या लयीत नाही. कामगिरी व्यवस्थित होत नसल्याने यंदाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तो खेळू शकणार नाही', असे एएफआयने म्हटले आहे.