मुंबई -अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने एका गुणाने तामिळ थलायवाजचा पराभव केला. या सामन्यात पायरेट्सने तामिळ थलायवाजचा स्टार खेळाडू राहुल चौधरीला रोखत हा सामना २४-२३ ने खिशात घातला.
प्रो कबड्डी - पायरेट्सने तामिळ थलायवाजच्या राहुलला रोखलं, रंजक सामन्यात पाटणाचा विजय
मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ ११-११ अशा फरकाने बरोबरीत होते.
पाटणाचा चढाईपटू प्रदीप नरवाल आणि तामिळ थलायवाजचा स्टार खेळाडू राहुल चौधरी यांच्यात द्वंद्व पाहायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही खेळाडूंना फारसा प्रभाव दाखवता आला नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रामध्येही दोन्ही संघात चांगली लढाई पाहायला मिळाली. मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ ११-११ अशा फरकाने बरोबरीत होते.
सामन्याचे दुसरे सत्रही चांगलेच गाजले. पाटणा पायरेट्सकडून दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या मोनूने बचावफळीत दमदार प्रदर्शन केले. प्रदीप नरवालने या सत्रात आपला पहिला गुण मिळवला. शेवटच्या मिनिटांमध्ये आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याच्या नादात राहुल चौधरीने लॉबी क्षेत्रात पाय ठेवत गुण पाटना संघाला दिला. शेवटी हा सामना २४-२३ ने पायरेट्सने आपल्या नावावर केला.