महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

प्रो कबड्डी : तामिळ थलायवाजने यूपी योद्धाला बरोबरीत रोखले - रिषांक देवडिगा

सामन्याच्या पहिल्या सत्रात, यूपी योद्धाचा संघ आघाडीवर होता.

प्रो कबड्डूी : तामिळ थलायवाजने योद्धाला बरोबरीत रोखले

By

Published : Aug 7, 2019, 10:00 PM IST

पाटणा - प्रो कबड्डीमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात बरोबरी पाहायला मिळाली. तामिळ थलायवाज संघाने यूपी योद्धा संघाला २८-२८ असे बरोबरीत रोखले. सुरुवातीपासून आघाडीवर असेलेल्या यूपी योद्धाला सामन्याच्या अंतिम क्षणी थलायवाजने रोखल्यामुळे ही बरोबरी साधता आली.

सामन्याच्या पहिल्या सत्रात, यूपी योद्धाचा संघ आघाडीवर होता. सुरुवातीला ३-३ अशी गुणसंख्या असणाऱ्या या सामन्यामध्ये यूपीने ६-३ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत पहिले सत्र संपेपर्यंत यूपीने १६-११ अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या सत्रातही, योद्धाचा संघ पुढे होता. त्यांनी १६-१३ अशी आघाडी घेतली. पण, थलायवाजचा संघ वरचढ होऊ लागला. सामन्याच्या ३१ व्या मिनिटांपर्यंत ही गुणसंख्या २३-२३ अशी पोहोचली होती. या गुणांनिशी, दोन्ही संघ बरोबरीत खेळत होते. आणि शेवटपर्यंत, २८-२८ गुणांनिशी हा सामना बरोबरीत सुटला.

यूपी योद्धाकडून रिषांक देवडिगाने पाच, सुमितने चार, मोनू गोयतने तीन गुण घेतले. तर, थलायवाज संघाकडून राहुल चौधरी आणि शब्बीर बापूने पाच-पाच गुण मिळवले.

ABOUT THE AUTHOR

...view details