टोकियो -जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेली स्वित्झर्लंडची बेलिंडा बेनसिक हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. बेलिंडाने 2 तास 30 मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात चेक गणराज्यचे माकेर्टा वोंद्रोसोवा हिचा 7-5, 2-6, 6-3 असा पराभव केला. या विजयासह ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
स्वित्झर्लंडसाठी यांनी जिंकलं आहे आत्तापर्यंत पदक
याआधी, मार्क रॉसेटने याने बार्सिलोना 1992 ऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरीत सुवर्ण पदक जिंकले होते. तर रॉजर फेडरर आणि स्टेन वावरिंका यांनी बिजींग 2008 ऑलिम्पिकमध्ये पुरूष दुहेरीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. याशिवाय फेडररने लंडन 2012 ऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरीत रौप्य पदक जिंकलं होतं. तर टिमिया बेसिंस्की आणि मार्टिना हिंगीस या जोडीने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये महिला दुहेरीत रौप्य पदकावर नाव कोरलं होते.