मुंबई- क्रीडा क्षेत्रातून एक दु: खद बातमी आली आहे. स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅप्पोट यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी स्वित्झर्लंडकडून १०० हून अधिक सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहेत. ते ७९ वर्षांचे होते.
आंतरराष्ट्रीय आईस हॉकी महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, रॉजर यांच्यावर मागील दोन आवड्यांपासून रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर ते घरी परतले आणि एक एप्रिलला त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे आतापर्यंत चार खेळाडूंना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात रॉजर यांच्या रुपाने आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. रॉजर हे स्वित्झर्लंडचे महान खेळाडू होते. त्यांनी ६०चे दशक यांनी चांगलेच गाजवले होते.