महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : सुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद

पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात अझरबाइजानच्या खादजिमुराद गधजियेव विरुद्ध सुशीलला ९-११ ने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात सुशीलने सुरुवातीला ८-२ ने आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, गधजियेवने आक्रमक खेळ करत सुशीलवर कुरघोडी केली.

By

Published : Sep 20, 2019, 3:51 PM IST

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : सुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद

कझाकिस्तान -ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदक पटकावलेल्या सुशील कुमारला विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत धक्का बसला आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सुशीलला पराभव स्विकारावा लागला.

हेही वाचा -'धोनीची वेळ संपली', गावस्करांचे कॅप्टन कुलबद्दल मोठे विधान

पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात अझरबाइजानच्या खादजिमुराद गधजियेव विरुद्ध सुशीलला ९-११ ने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात सुशीलने सुरुवातीला ८-२ ने आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, गधजियेवने आक्रमक खेळ करत सुशीलवर कुरघोडी केली.

विश्व ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये गधजियेवने कांस्यपदक पटकावले होते. तर, सुशीलने २००८ च्या बीजिंग आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. याअगोदर बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात, तर रवि कुमार दाहिया याने ५७ किलो वजनी गटात स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

उपांत्य फेरीच्या कामगिरीसह दोघांनी २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे. दरम्यान, यापूर्वी बुधवारी भारताची विनेश फोगटने ऑलिम्पिकचे तिकिट पक्के केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details