नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे. या दोन्ही खेळाडूंना या कसोटीत उतरवण्याचा निर्णय संघाचा कर्णधार रोहित शर्माने घेतला होता. सामना सुरू होण्यापूर्वी, सूर्या आणि केएस भरत यांच्याकडे मैदानावरील कसोटी पदार्पणासाठी कॅप देण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवला कसोटी कॅप दिली.
सूर्यकुमार यादवची कारकीर्द :T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवल्यानंतर सूर्यकुमार यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एंट्री केली होती. पण, कसोटी क्रिकेटसाठी त्याला बराच काळ वाट पाहावी लागली. अखेरीस, नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते त्यांना कसोटी कॅप मिळाली. यादरम्यान सूर्यकुमारचे भाव पाहण्यासारखे होते. सूर्यकुमारसोबतच यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतसुद्धा कसोटीत पदार्पण करीत आहे. त्याला नागपूर कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्येही स्थान मिळाले आहे.
कसोटी पदार्पणासाठी केएस भरतकडे कॅप :त्याचवेळी चेतेश्वर पुजारानेही आपल्या कारकिर्दीतील कसोटी पदार्पणासाठी केएस भरतकडे कॅप सोपवली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने ऑफस्पिनर टॉड मर्फीचा नागपूर कसोटीसाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 22 वर्षीय टॉड मर्फीलाही कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.