बंगळुरू : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने बुधवारी मोठा विक्रम केला. सुनील फुटबॉलच्या इतिहासातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. SAFF चॅम्पियनशिप 2023 च्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारताचा सामना चालू होता. या खेळात भारताच स्टार फुटबॉलपटू सुनील छत्रीने पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक साधून आंतरराष्ट्रीय गोल-स्कोअरिंग चार्टमध्ये आपले नाव नोंदवले आहे. छेत्रीच्या खेळामुळे भारताने पाकिस्तानाचा 4-0 असा पराभव केला.
चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू : दुसऱ्या हाफच्या उत्तरार्धात छेत्रीने आपल्या संघाचे चांगले नेतृत्व केले. सुनीलने 74व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टीवर गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या स्ट्राइकसह तो क्रिस्टियानो रोनाल्डो, अली दाई आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. याबरोबर छेत्रीने मेलिशियाचा दिग्गज फुटबॉलपटू मोख्तार दहारीचा विक्रम मोडला आहे. दहारीने 142 सामन्यांमध्ये 89 गोल केले होते. तर छेत्रीने पाकिस्तान विरुद्धाच्या सामन्यात हॅट्ट्रिक करत 138 सामन्यात 90 गोल केले.
रोनाल्डो आहे आघाडीवर : 138 सामन्यात 90 गोल करत छेत्री थेट अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे. मेस्सीने 173 सामन्यात 103 गोल केले आहेत. सर्वोधिक गोल करणाऱयाच्या यादीवर नजर टाकली तर आघाडीवर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू आहे. तो म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याने 200 सामन्यांमध्ये 123 गोल केले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी इराणचा अली दाई हा फुटबॉलपटू आहे. त्याने आतापर्यंत 148 सामने खेळत 109 गोल केले आहेत. तर या यादीत तिसऱ्या स्थानी मेस्सी आहे.
पहिला गोल : SAFF चॅम्पियनशिप 2023 चा सामना बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळला गेला. यावेळी यजमान भारताने पाकिस्तानला पराभूत केले. कर्णधार सुनील छेत्रीच्या खेळामुळे भारतीय संघ या टूर्नामेंटमध्ये इतर संघाच्या वरच्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात छेत्रीने हॅटट्रिक केली तर उदांता सिंग कुमामने भारतासाठी चौथा गोल केला. भारतीय कर्णधाराची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी म्हणजे सुनीलने पहिल्या हाफमध्येच दोन गोल करून पाकिस्तानला पिछाडीवर नेले. तर दुसऱ्या हाफमध्ये भारताने तिसरा गोल केला. पाकिस्तानचा गोलरक्षक हसन बशीर याची बकवास गोलकिपिंग पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली साहजिकच भारतासाठी त्याचा खेळ फायदेशीर राहिला. खेळाच्या 10 मिनिटाला पाक गोलरक्षक हसन बशीर याला चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नसल्याने छेत्रीने पहिला गोल केला होता. बशीरच्या चुकीच्या पासमुळे छेत्रीने पहिला गोल केला.
प्रशिक्षक विना भारताचा खेळ : त्यानंतर 6 व्या मिनिटानंतर छेत्रीने पेनल्टी स्पॉटवरुन गोलत करत भारताला दुप्पट आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाकिस्तान फुटबॉलपटूंची धांदल उडाली. दरम्यान भारताने दुसऱ्या हाफमध्ये मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांच्याशिवाय खेळ केला. कारण हाफ टाईमच्या उंबरठ्यावर सामना असताना त्याच्या कृत्यामुळे प्रशिक्षकला लाल कार्ड दाखवण्यात आले होते. स्टिमॅकने पाकिस्तानच्या बचावपटूला थ्रो-इन घेण्यापासून रोखले. त्याच्या हातातून चेंडू हिसकावला ज्यामुळे दोन्ही बाजूंच्या खेळाडूंमध्ये मैदानावर वाद सुरू झाला. त्यानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांना रेड कार्ड दाखवण्यात आले.
हेही वाचा -
- Indian Footballer Sunil Chhetri : 38 वर्षांचा सुनील छेत्री पोहोचला कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात, ब्लू टायगर्ससाठी केले 84 गोल
- Sunil Chhetri Viral Video : चक्क...! फोटो काढण्यासाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला सारले मागे, पाहा व्हायरल व्हिडिओ