दुबई -खांद्याच्या दुखापतीशी झुंज देताना भालाफेक खेळाडू सुंदर सिंग गुर्जरने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतासाठी दुसरे सुवर्ण जिंकले. यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्श करत सुंदरने हा कारनामा केला आहे.
हेही वाचा -क्रिकेट सोडून धोनी टेनिसच्या मैदानावर गाळतोय घाम..पाहा व्हिडिओ
या कामगिरीमुळे सुंदरने आगामी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी कोटा मिळवला आहे. देवेंद्र झझारिया नंतर विश्वचषक स्पर्धेत दोन पदके जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. देवेंद्रने २०१३ आणि २०१५ मध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले होते.
पहिल्या पाच प्रयत्नांनंतर दुसर्या स्थानावर असलेल्या सुंदरने सहाव्या प्रयत्नात ६१.२२ मीटर लांब भाला फेकला आणि श्रीलंकेच्या दिनेश पी. हेराथ मुडियांसेलगेचा पराभव करून प्रथम स्थान मिळविले. भारताच्या अजितसिंगने कांस्यपदक जिंकले तर रिंकू चौथ्या स्थानावर राहिला. या दोन्ही खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेतही प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, भारताच्या संदीप चौधरी आणि सुमित अंतिल यांनी यापूर्वी पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.