मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. बोल्टच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पार्टनर केसी बेनेट हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जमैकाचे पंतप्रधान अॅण्ड्रू होलनेस यांनी सोशल मीडियावरून ही बातमी देताना बोल्टचे अभिनंदन केलं आहे.
होलनेस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'आमचा वेगवान धावपटू बोल्ट आणि केसी बेनेट यांच्या घरी नन्ही परी आली. त्यांचे अभिनंदन.'
जमैकाच्या स्थानिक माध्यमानी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी बोल्टच्या घरी मुलीचा जन्म झाला. बोल्टने मार्च महिन्यात केसी प्रेग्नेंट असल्याचे सांगितले होते.
ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदक जिंकणाऱ्या बोल्टच्या नावावर अजूनही 100 व 200 मीटर शर्यताची विश्वविक्रम आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2016मध्ये बोल्टने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीचे जेतेपद पटकवण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव पुरुष धावपटू आहे.
बोल्टने 2002मध्ये विश्व ज्युनियर चॅम्पियनशीपच्या 200 मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यावेळी तो जागतिक स्तरावरील सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू ठरला होता. त्याने 2017मध्ये निवृत्ती जाहीर केली.
हेही वाचा -लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात क्रीडा संकुले आणि स्टेडियम उघडणार
हेही वाचा -यावर्षी कोणताही भारतीय खेळाडू परदेशी स्पर्धेत भाग घेणार नाही - सुमारीवाला