महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

देशातील सहा 'केआयएससीई'साठी क्रीडा मंत्रालयाची मान्यता; पुण्यातील बालेवाडीचा समावेश - क्रीडा मंत्रालय केआयएससीई निधी न्यूज

देशाच्या कानाकोपऱ्यात गुणवत्ता असलेले अनेक खेळाडू आहेत. मात्र, त्यांना सुविधा न मिळाल्याने पुढे जाता येत नाही. यासाठी आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. देशात सहा ठिकाणांना क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता दिली.

Stadium
स्टेडिअम

By

Published : Nov 7, 2020, 5:41 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सहा केंद्रांना 'खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स' (केआयएससीई) म्हणून मान्यता दिली आहे. या सहा केंद्रांच्या विकासासाठी क्रीडा मंत्रालयाने ६७.३२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांसाठी खेळाडू घडवण्याचे काम होणार आहे.

आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय, सिक्कीम, दादरा आणि नगर हवेली व दीव-दमन या ठिकाणी ही केआयएससीई होणार आहेत. या केद्रांना मान्यता देऊन शासनाने खेळाडूंच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. २०२८पर्यंत भारताला ऑलिम्पिकमधील टॉप-१० देशांमध्ये स्थान मिळावे हा या मागचा हेतू आहे. जोपर्यंत आपण खेळाडूंना सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवणार नाहीत, तोपर्यंत आपण त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू शकत नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले.

या उपक्रमाला प्रत्येक राज्याने सकारात्मकपणे पाठिंबा दिला आहे. प्रत्येक केआयएससीई मध्ये खेळाडूंना चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षण दिले जाईल. याठिकाणी प्रशिक्षक, आरोग्य अधिकारी देखील खेळाडूंसाठी उपलब्ध राहतील, असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

केआयएससीई असलेली ठिकाणे आणि मिळालेला निधी -

  • आसाम - राज्य क्रीडा अकादमी, सरुसाजाई (७.९६ कोटी रुपये)
  • मेघालय - जे. एन. एस कॉम्प्लेक्स, शिलाँग (८.३९ कोटी रुपये)
  • दमन आणि दीव - न्यू स्पोर्टस् कॉम्प्लेक्स सिल्वासा (८.५ कोटी रुपये)
  • मध्य प्रदेश - एमपी स्टेट अकादमी (१९ कोटी रुपये)
  • महाराष्ट्र - श्री शिवछत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे (१६ कोटी रुपये)
  • सिक्कीम - पालजोर स्टेडिअम, गंगटोक (७.९१ कोटी रुपये)

ABOUT THE AUTHOR

...view details