नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी नामांकनाची तारीख 22 जूनपर्यंत वाढवली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे खेळाडूंना स्वत: चे अर्ज दाखल करण्यासही मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
यापूर्वी बुधवारी म्हणजे 3 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले, "केंद्रीय नेतृत्वाची मान्यता मिळाल्यानंतर आम्ही अधिकारी व व्यक्तींच्या शिफारशीवर पाठवलेले अर्ज सादर करण्याचा नियम रद्द केला आहे. म्हणून आता खेळाडू कोणत्याही अधिकारी किंवा व्यक्तीशिवाय अर्ज करू शकतात. म्हणून हा भाग फॉर्ममधून काढून टाकला आहे. "