नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) नवीन लोगोचे अनावरण केले. १९८२नंतर प्रथमच हा लोगो बदलण्यात आला आहे.
या कार्यक्रमानंतर रिजिजू म्हणाले, ''मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लवकरच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा लोगो बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. हा लोगो अधिक सोपा आणि अर्थपूर्ण करण्यास सांगितले होते. नवीन लोगो छोटा आहे. परंतू त्याचा अर्थ आणि ध्येय मोठे आहे. लोगो ही संस्थेची ओळख असते.''
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या एका सोहळ्यात या लोगोचे अनावरण झाले. या समारंभास क्रीडा सचिव रवी मित्तल, क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा उपस्थित होते.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (sports authority of india) हा भारतीय क्रीडा मंत्रालयाचा एक महत्त्वाचा आहे. क्रीडा प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून भारतीय क्रीडा प्राधिकरण युवकांमध्ये प्रतिभा निर्माण करण्याचे काम करते. यासाठी ते त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा, उपकरणे, प्रशिक्षण सुविधा आणि स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देते. भारतीय क्रीडा प्राधिकरण ही भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे.