महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कर्नाटकच्या विक्रमवीर 'उसेन बोल्ट'ची क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल, म्हणाले.... - kiren rijiju call for Srinivas gawda news

'एसएआयच्या वरिष्ठ प्रशिक्षकांकडून चाचण्यांसाठी मी श्रीनिवास गौडा यांना बोलावून घेईन. ऑलिम्पिकमध्ये, लोकांना सहसा अ‍ॅथलेटिक्सविषयी योग्य ज्ञान नसते, तेथे अफाट सामर्थ्य आणि सहनशक्ती असते. भारताच्या कोणत्याही प्रतिभेवर अन्याय होणार नाही याची मी खात्री करुन घेईन', असे रिजीजू यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

sports minister kiren rijiju got a call for Srinivas gawda for sai trials
कर्नाटकच्या विक्रमवीराची क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल, म्हणाले....

By

Published : Feb 15, 2020, 7:27 PM IST

नवी दिल्ली -रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत कर्नाटकचा श्रीनिवास गौडा जगासमोर आला. त्याने १४२.५ मीटरचे अंतर १३.६२ सेकंदात पार करत या स्पर्धेचा ३० वर्षांचा जुना विक्रम मोडित काढला. त्याच्या या कारनाम्याची दखल क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी घेतली असून भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (एसएआय) चाचणीसाठी बोलावून घेतले आहे.

हेही वाचा -१० वर्षाच्या मुलाने केलेला गोल पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही...पाहा व्हिडिओ

'एसएआयच्या वरिष्ठ प्रशिक्षकांकडून चाचण्यांसाठी मी श्रीनिवास गौडा यांना बोलावून घेईन. ऑलिम्पिकमध्ये, लोकांना सहसा अ‍ॅथलेटिक्सविषयी योग्य ज्ञान नसते, तेथे अफाट सामर्थ्य आणि सहनशक्ती असते. भारताच्या कोणत्याही प्रतिभेवर अन्याय होणार नाही याची मी खात्री करुन घेईन', असे रिजीजू यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

किरेन रिजीजू यांचे ट्विट

श्रीनिवास हा दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील मुदाबिदरी गावचा रहिवाशी आहे. कंबालामध्ये (चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक बैलगाडी शर्यत) विक्रम नोंदवल्यानंतर तो चर्चेत आला आहे. श्रीनिवासने रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले. याचा अर्थ गौडाने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले. जगात सर्वात जलद धावण्याचा विक्रम जमैकाच्या उसेन बोल्टच्या नावे आहे. त्याने १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदात पूर्ण केले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details