भुवनेश्वर -केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२०' च्या पहिल्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या स्पर्धेचा समारोप १ मार्चला होईल.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२०
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२०
हेही वाचा -INDvsSL : मालिकेत आघाडी कोणाची?...इंदूरचे मैदान दुसऱ्या टी-२० साठी सज्ज
या स्पर्धेत १७ विविध खेळांचे खेळाडू सहभागी होणार असून या सर्व स्पर्धा आयआयटी, भुवनेश्वर येथे पार पडणार आहेत. क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ओडिशा येथे 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२०' च्या पहिल्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर केले. खेळ सुरू होऊ द्या!', असे खेलो इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
ओडिशाच्या भुवनेश्वर येथे या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा अधिकृत लोगो प्रधान यांनी सादर केला.