पुणे : विवो प्रो कबड्डी लीगच्या ( Vivo Pro Kabaddi League in Pune ) नवव्या मौसमातील 14 रंगतदार लढतींमुळे पुण्यातील कबड्डीप्रेमी खूश झाले ( Kabaddi Lovers in Pune are Delighted ) असून, श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी ( Vivo Pro Kabaddi League and They will be Able to Enjoy ) येथे आणखी दोन आठवडे रंगणाऱ्या सामन्यांचा आनंद त्यांना घेता येणार आहे. विवो प्रो कबड्डी लीगच्या पुण्यातील दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी लीगचे मुख्य आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी पुण्यात एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला सर्व 12 संघांचे प्रतिनिधी आणि हेड स्पोर्ट्स लीग, मशाल स्पोर्ट्स आणि विवो प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी ( Vivo Pro Kabaddi League Anupam Goswami ) उपस्थित होते.
चाहत्यांचे मानले आभार :पुणेरी पलटण संघाचा कर्णधार फाजल अत्राचली याने पुणेकर चाहत्यांसाठी खास संदेश देताना सांगितले की, गेली तीन वर्षे आम्हाला या चाहत्यांची गैरहजेरी चांगलीच जाणवली होती. यावेळी पुन्हा त्यांच्यासमोर खेळताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. कोणत्याही क्रीडा स्पर्धेला पाठीराख्यांशिवाय अर्थ नसतो. चाहते आम्हाला जोरदार प्रोत्साहन देत असताना दररोज खेळासाठी प्रेरणा देतात आणि आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी पुणेकर चाहत्यांचे आभार मानतो.