नवी दिल्ली :फिफा विश्वचषकात(FIFA World Cup 2022) स्पेनने बुधवारी कोस्टा रिकाचा एकतर्फी सामन्यात ७-० असा पराभव केला. (Spain vs Costa Rica). स्पेनचा युवा मिडफिल्डर गाव्हीने (Gavi) या सामन्यात एक इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात गोल करणारा गाव्ही हा तिसरा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. तसेच तो 1958 मध्ये ब्राझीलचा महान खेळाडू पेलेनंतर गोल करणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला आहे. गाव्हीने सामन्याच्या 74व्या मिनिटाला गोल केला होता.
FIFA World Cup 2022 : युवा गाव्ही बनला विश्वचषकात खेळणारा सर्वात तरुण स्पॅनिश खेळाडू, सामन्यात गोल करताच आणखी एक विक्रम केला नावे - विश्वचषकात खेळणारा सर्वात तरुण स्पॅनिश खेळाडू
गाव्ही (Gavi) हा विश्वचषकात खेळणारा सर्वात तरुण स्पॅनिश खेळाडू बनला आहे. कोस्टारिका विरुद्धच्या सामन्यात (Spain vs Costa Rica) पदार्पण करताच गाव्ही फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup 2022) स्पेनचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात तरुण खेळाडू (18 वर्षे, 110 दिवस) बनला.
स्पेनचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात तरुण खेळाडू: एवढेच नाही तर गाव्ही हा विश्वचषकात खेळणारा सर्वात तरुण स्पॅनिश खेळाडू आहे. कोस्टारिका विरुद्धच्या सामन्यात पदार्पण करताच गाव्ही फिफा विश्वचषक स्पर्धेत स्पेनचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात तरुण खेळाडू (18 वर्षे, 110 दिवस) बनला. गाव्हीपूर्वी हा विक्रम सेस फॅब्रेगासच्या नावावर होता. त्याने २००६ च्या विश्वचषकात युक्रेनविरुद्ध आपले पदार्पण केले होते. तसेच गाव्हीने या वर्षीचा 'गोल्डन बॉय' हा पुरस्कार देखील जिंकला आहे. फिफा द्वारे दिला जाणार हा पुरस्कार चालू वर्षातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूला दिला जात असतो.
पेले गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू:1958 मध्ये, ब्राझीलने अंतिम फेरीत स्वीडनचा पराभव केला होता. तेव्हा पेलेने वयाच्या 17 वर्षे व 249 व्या दिवशी गोल केला होता. विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत एक गोल नोंदवून त्याने सर्वात तरुण गोल करणारा खेळाडू होण्याचा विक्रम केला होता. मेक्सिकोचा मॅन्युएल रोसास हा दुसरा सर्वात तरुण गोल करणारा खेळाडू आहे. त्याने 1930 मध्ये वयाच्या 18 वर्षे 93 व्या दिवशी हा गोल केला होता. त्याचवेळी, स्पेनचा गाव्ही वयाच्या 18 वर्षे 110 व्या दिवशी गोल करून तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.