बीजिंग -तब्बल १३ वर्षांचा दुष्काळ संपवत स्पेनने बास्केटबॉलची विश्वकरंडक स्पर्धा आपल्या नावावर केली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाला ९५-७५ असे पराभूत केले.
हेही वाचा -विदर्भ क्रिकेट संघाचे नेतृत्व वसीम जाफरकडे

अंतिम सामन्यात पूर्ण वेळ स्पेनने आपली आघाडी कायम ठेवली. स्पेनने आत्तापर्यंत दोनवेळा विश्वकरंडक स्पर्धा जिंकली आहे. याआधी २००६ मध्ये स्पेनने विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. एकाच वर्षी एनबीएचा किताब आणि विश्वकरंडक उंचावणारा मार्क गेसोल हा दुसरा खेळाडू ठरला आहे.
२००६ मधील स्पेनच्या संघात मार्क गेसोलचा समावेश होता. त्यावेळी त्याचा भाऊ पाऊ याचाही संघात समावेश होता. मात्र, यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. यंदा गेसोलने टोरंटो रॅपटर्सच्या संघातून खेळताना एनबीएचा किताब पटकावला आहे.
गेसोलने अंतिम सामन्यात १४ गुण मिळवले. त्याने अमेरिकेच्या लमार ओडोमची बरोबरी केली. ओडोमने विश्वकरंडक स्पर्धेबरोबर लॉस एंजेलिस लेकर्ससाठी एनबीएचा किताब पटकावला होता. स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.