नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 16वा सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलमधील सर्व संघाच्या खेळाडूंनी त्यांचे गिअर घट्ट केले आहेत. यासोबतच आयपीएल संघांचे मालकही कर्णधाराची निवड अत्यंत काळजीपूर्वक करीत आहेत. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल सुरू होण्यापूर्वी आपला नवा कर्णधार निवडला आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान फलंदाज एडन मार्कराम याची सनरायझर्स हैदराबादने संघाचा 9वा कर्णधार म्हणून निवड केली आहे. साऊथ आफ्रिकेचा स्टार खेळाडू एडन मार्कराम आता सनरायझर्स संघाची कमान सांभाळणार आहे.
एडन मार्करामची उत्तम कामगिरी :एडन मार्करामने दक्षिण आफ्रिकन टी-२० लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्न केपला चॅम्पियन बनवले. सनरायझर्स हैदराबादने आपल्या कर्णधाराची माहिती ट्विट करून शेअर केली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आता प्रतीक्षा संपली आहे, आमच्या संघाचा नवा कर्णधार एडन मार्करामला सलाम.' अलीकडेच, दक्षिण आफ्रिकन T20 लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केपने या लीगचे विजेतेपद पटकावले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सनग्रुप हा सनरायझर्स हैदराबाद आणि सनरायझर्स इस्टर्न केप या दोन्ही संघांचा मालक आहे.
मुख्य प्रशिक्षक ब्रायन लाराशी केली सल्लामसलत :एडन मार्करामने या अगोदर साऊथ आफ्रिकेच्या टीमचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला विश्वकप जिंकून देणारा तो एकमेव कर्णधार आहे. या गुणी खेळाडूच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेने २०१४ मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. सनरायझर्स हैद्रबादच्या वरिष्ठांनी सांगितले की, आमच्या व्यवस्थापनाने, मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा यांच्याशी चर्चा करून, मार्करामला त्याच्या अलीकडील SA20 मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केल्यानंतर कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने सनरायझर्स इस्टर्न केप संघाचे नेतृत्व केले.
एडन मार्करामने स्वीकारली जबाबदारी :एडन मार्करामची नियुक्ती झाल्यानंतर त्याने सांगितले की, मी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. माझ्याकडून मी सर्वोतोपरी प्रयत्न करून संघाला सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बाकीच्या गोष्टी संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहेत. आयपीएल लिलावात सनरायझर्सने केन विल्यमसनला खरेदी न केल्यामुळे अर्थातच त्याची जागा रिक्त होती. व्यवस्थापनाला एका दर्जेदार कर्णधाराची गरज होती. त्यांनी यावर मुख्य प्रशिक्षक ब्रायन लाराशी चर्चा करून मार्करामला संघाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघ 8 व्या स्थानावर होता. आता संघ व्यवस्थापनाने संघात बदल केल्यामुळे टीम हैद्राबाद काय कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एडेन मार्करामची तडफदार कारकिर्द :एडेन मार्कराम हा लहानपणापासूनच फटकेबाजी करणारा तडफदार फलंदाज म्हणून नावारूपाला आला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून स्वप्नवत धावा केल्यानंतर त्याने साऊथ अफ्रिकेला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदापर्यंत नेऊन दक्षिण अफ्रिकेला विश्वचषक मिळवून दिला. स्पर्धेच्या आघाडीवर असणा-या अप्रतिम संख्यांनंतर निवडीच्या जोरावर निवडून आल्याने, त्याने निवडकर्त्यांच्या विश्वासाची परतफेड केली आणि प्रोटीजचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून स्पर्धेचा शेवट करण्यासाठी उत्कृष्ट योगदान दिले आणि निराश झालेल्या राष्ट्रात विश्वचषक घेऊन जात देशाची शान वाढवली. मार्कराम सुरवातीपासूनच आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू आहे. जेव्हा त्याला त्याच्या यशाबद्दल विचारले तेव्हा त्याने आपल्या कामगिरीचे वर्णन केले, त्याने उत्कृष्ट वर्णन करणारे तीन शब्द सूचीबद्ध केले, 'सकारात्मक, आत्मविश्वास आणि जबाबदार' या तीन गोष्टीने तो स्पर्धेत टिकून आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा संघ : एडन मार्क्रन (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नजरजन, मयंक अग्रवाल, ब्रोकन, ब्रोकन, ब्रोकरन क्लासेन, अकिल हुसेन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, आदिल रशीद, समर्थ व्यास, विव्रत शर्मा, सनवीर सिंग, नितीश कुमार, मयंक डागर, उपेंद्र सिंग यादव.
हेही वाचा : ICC Women T20 World Cup 2023 : आजच्या सेमीफायनलमध्ये 'हे' खेळाडू मोडू शकतात एकमेकांचे रेकाॅर्ड; वाचा त्यांच्या नावावरील विक्रम