महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC T20 Rankings : स्मृतीने करिअरमधील सर्वश्रेष्ठ रेटींग केल्या प्राप्त; आईसीसी रॅकींगमध्ये तिसऱ्या स्थानावर कायम - स्मृतीला करिअरमधील सर्वश्रेष्ठ रेटींग प्राप्त

भारताच्या स्मृती मंधानाने ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत ( ICC Womens T20 Rankings ) कारकिर्दीतील सर्वोत्तम 741 रेटिंग ( Smriti Mandhana Achieved Best 741 Rating Points ) गुण मिळवले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झालेल्या स्मृतीला 11 रेटिंग गुण मिळाले आहेत.

Smriti Mandhana Achieved Best 741 Rating Points
स्मृतीने करिअरमधील सर्वश्रेष्ठ रेटींग केल्या प्राप्त

By

Published : Dec 13, 2022, 8:14 PM IST

दुबई : भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने मंगळवारी जाहीर झालेल्या ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय ( ICC Womens T20 Rankings ) क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 741 रेटिंग गुणांची ( Smriti Mandhana Achieved Career Best 741 Rating Points ) कमाई केली. T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ती तिसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झालेल्या स्मृतीला 11 रेटिंग गुण मिळाले आहेत. दुसरा सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारताने सुपर ओव्हर जिंकली.

ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा जगातील नंबर वन फलंदाज :भारतविरुद्धच्या चालू मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा जगातील नंबर वन फलंदाज बनली आहे. ICC नुसार, 27 वर्षीय ताहलिया 40 आणि 70 धावांच्या खेळीमुळे महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी आणि एकूण 12वी फलंदाज ठरली. तिने देशबांधव मेग लॅनिंग आणि बेथ मुनी तसेच स्मृती यांना मागे टाकत तीन स्थानांनी पुढे झेप घेतली.

या आहेत टी20 मधील रेटींगनुसार आघाडीच्या महिला फलंदाज :या वर्षी 3 ऑगस्टपासून मुनीने लॅनिंगला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ताहलिया केवळ 16 सामने खेळून जगातील नंबर वन फलंदाज बनली आहे. यापूर्वी 2010 मध्ये वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर केवळ 15 सामने खेळून जगातील नंबर वन फलंदाज बनली होती. भारताची सलामीवीर शफाली वर्माला अलिकडच्या वर्षांत अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी सर्वात कमी वेळ लागला. शेफालीने 18 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

या भारतीय फलंदाजांचा T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या टॉप 10 यादीत समावेश :भारताच्या शफाली आणि जेमिमाह रॉड्रिग्सचाही T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या टॉप 10 यादीत समावेश आहे. जेमिमाला एक स्थान मिळाले असून ती सहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत, भारताच्या दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंह ठाकूर यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान कायम राखले आहे. इंग्लंडची लेगस्पिनर सारा ग्लेन एका स्थानाने देशबांधव सोफी एक्लेस्टोनच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details