क्वाललंपुर:भारतीय महिला बॅडमिंटनपटू दोन दिग्गज खेळाडू पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल बुधवारी मलेशिया ओपन सुपर 750 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भाग घेण्यासाठी कोर्टवर उतरल्या होत्या. ज्यामध्ये सिंधूने सामना जिंकून ( PV Sindhu wins in Malaysia Open ) दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर सायनाला पराभवाचा सामना करावा लागला. माजी विश्वविजेत्या सिंधूने थायलंडच्या आणि जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकाच्या पोर्नपावी चोचुवाँगचा 21-13, 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव केला.
दुसरीकडे, लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायनाला ( London Olympics bronze medalist Saina Nehwal ) जागतिक क्रमवारीत 33व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या आयरिस वांगकडून 37 मिनिटांत 11-21, 17-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. सातव्या मानांकित सिंधूचा पुढील सामना 21 वर्षीय थायलंडच्या फितायापोर्न चैवानशी होईल, जी जागतिक कनिष्ठ क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तसेच ती बँकॉक येथील उबेर चषक स्पर्धेत थायलंडच्या कांस्यपदक विजेत्या संघाचाही भाग होती.