बँकॉक: भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ( Indian badminton player PV Sindhu ) आणि किदाम्बी श्रीकांत यांनी त्यांचे एकेरी सामने जिंकून थायलंड ओपन 2022 च्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र बुधवारी झालेला सामना गमावल्याने सायना नेहवाल स्पर्धेबाहेर पडली ( Saina Nehwal out of the competition ). दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने इम्पॅक्ट एरिना येथे अमेरिकेच्या लॉरेन लॅमचा 21-19, 19-21, 21-18 असा पराभव केला.
सिंधूचा लॉरेन लॅमवर तिसरा विजय ( Sindhu third win over Lauren Lam )आहे. या 26 वर्षीय खेळाडूची आता जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानी असलेल्या जपानच्या सायाका ताकाहाशी आणि जागतिक क्रमवारीत 46व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाच्या सिम यू जिन यांच्यातील विजेत्याशी लढत होईल. दुसरीकडे, लंडन 2012 ऑलिम्पिक पदक विजेती सायनाने जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाच्या किम गा युनविरुद्ध चांगली सुरुवात केली. मात्र, ती गती राखण्यात अपयशी ठरली आणि 21-11, 15-21, 17-21 असा पराभव पत्करून ती स्पर्धेतून बाहेर पडली.
दरम्यान, आगामी भारतीय शटलर मालविका बनसोडने ( Indian shuttler Malvika Bansod ) जागतिक क्रमवारीत ५९व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या मारिजा उलिटिनावर 17-21, 21-15, 21-11 असा विजय मिळवला. 57व्या क्रमांकावर असलेल्या बन्सोडची दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत २२व्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या क्रिस्टोफरसनशी लढत होईल. क्रिस्टोफरसनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अॅन से यंगला मागे टाकले होते.