बंगळुरू : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू ( Lakshya Sen ) लक्ष्य सेन ( International Badminton Player Lakshya Sen ) याच्यावर वयाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी ( Case Registered Against International Badminton Player Lakshya Sen ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक पोलिसांनी ही माहिती दिली. बॅडमिंटन अकादमी चालवणारे नागराज एम. जी. यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, लक्ष्य सेन यांचा जन्म 1998 मध्ये झाला होता. मात्र, त्यांनी चुकीच्या पद्धतीने 2001 ही जन्मतारीख नमूद केली होती. खोटी कागदपत्रे तयार करून आरोपींनी इतर गुणवान खेळाडूंची फसवणूक करून शासनाकडून लाभ मिळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Badminton Player Lakshya Sen : लक्ष्य सेन याच्यावर जन्मतारीखेमध्ये बदल केल्याचा आरोप, केस दाखल; 30 नोव्हेंबर रोजी मिळाला होता अर्जुन पुरस्कार - Shuttler Lakshya Sen Accused of Fudging Age
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू ( Lakshya Sen ) लक्ष्य सेन ( International Badminton Player Lakshya Sen ) याच्यावर वयाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा ( Case Registered Against International Badminton Player Lakshya Sen ) दाखल करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या कुटुंबासहित प्रशिक्षकांवर आरोप :बंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनचे वडील धीरेंद्र कुमार सेन, त्यांची आई निर्मला सेन, चिराग सेन, त्यांचा भाऊ आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याचे वडील धीरेंद्र कुमार सेन हे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत, तर त्याचा भाऊ चिराग सेन हादेखील बॅडमिंटनपटू आहे. प्रमाणपत्रात लक्ष्य आणि चिराग यांच्या जन्माच्या तपशिलात छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशनचे विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे प्रशिक्षक यांच्या संगनमताने आरोपी त्यांच्या वयोगटाखालील प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत असल्याचा आरोपही तक्रारकर्त्याने केला आहे.
तक्रारदार नागराजू यांनी लक्ष्य सेनला आरोपी क्रमांक तीन म्हटल्याचा उल्लेख :साल 2010 पासून असे होत असल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारदार नागराजू यांनी लक्ष्य सेनला आरोपी क्रमांक तीन म्हटले आहे. त्यांनी वैयक्तिक तक्रारीसह स्थानिक न्यायालयात संपर्क साधला ज्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्य सेन यांना नुकताच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.