नवी दिल्ली:भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. (India vs Sri Lanka T20 ) श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज शिवम मावी (Arshdeep Singh) आज T20 मध्ये पदार्पण करत आहेत. मंगळवारी नाणेफेकीपूर्वी दोन्ही खेळाडूंना T20I पदार्पणाच्या कॅप्स देण्यात आल्या. (India vs Sri Lanka) शुभमन गिलला सूर्यकुमार यादवने इंडिया कॅप दिली तर कर्णधार हार्दिक पंड्याने शिवम मावीला दिली.
गिलने भारतासाठी आतापर्यंत १३ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ७३६ आणि ६८७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.25 च्या सरासरीने 687 धावा केल्या आहेत. यामध्येही त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर शिवम मावीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. अर्शदीप सिंगच्या जागी मावीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.