दोहा -अव्वल भारतीय टेबल टेनिसपटू अचिंत शरथ कमल, जी सथियान आणि मनिका बत्रा यांनी डब्ल्यूटीटी स्टार कॉन्टेन्डर दोहा येथे विजयी प्रारंभ केला. मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्सचा चॅम्पियन शरथ कमलने ब्रायन आफंदरविरुद्ध पहिल्या गेममध्ये संघर्ष करावा लागला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत त्याने आफंदरविरूद्ध ८-११, ११-८. ११-७, ११-१ असा विजय मिळवला. आता मंगळवारी त्याचा सामना जर्मनीच्या पॅट्रिक फ्रान्सिस्काच्या होईल.
जागतिक क्रमवारीत ३७व्या स्थानी असलेला भारताचा जी. साथियानही पहिल्या आणि दुसऱ्या गेममध्ये अपयशी ठरला. मात्र, त्यानेही जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. साथियानने फ्रान्सचा प्रतिस्पर्धी इमॅन्युएल लेबेसनवर ९-११, ७-११, ११-७, ११-४, ११-४ असा विजय मिळवला. आता त्याचा पुढील सामना जपानच्या टोमोकाजू हरीमोतोशी होईल.