नवी दिल्ली - गुरुवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या (आयटीटीएफ) ताज्या क्रमवारीत भारताच्या शरथ कमलने ३१ वे स्थान गाठले आहे. या क्रमवारीमुळे तो भारताचा अव्वल क्रमांकाचा टेटेपटू ठरला आहे.
शरथ कमल ठरला भारताचा अव्वल टेटेपटू - भारताचा अव्वल टेटेपटू लेटेस्ट न्यूज
गेल्या महिन्यात शरथने ओमान ओपनमध्ये जेतेपद जिंकले होते. वरिष्ठ पुरुष रँकिंगमध्ये त्याला सात स्थानांचा फायदा झाला होता. “ही एक चांगली बातमी आहे. नकारात्मक परिस्थितीत चांगली वार्ता मिळाली”, असे शरथने सांगितले.

शरथ कमल ठरला भारताचा अव्वल टेटेपटू
गेल्या महिन्यात शरथने ओमान ओपनमध्ये जेतेपद जिंकले होते. वरिष्ठ पुरुष रँकिंगमध्ये त्याला सात स्थानांचा फायदा झाला होता. “ही एक चांगली बातमी आहे. नकारात्मक परिस्थितीत चांगली वार्ता मिळाली”, असे शरथने सांगितले.
युवा खेळाडू मुकुल दानीनेही क्रमवारीत चांगले यश मिळवून टॉप-२००मध्ये स्थान मिळवले आहे. त्याने नऊ स्थानांची झेप घेत २००वे स्थान मिळवले आहे.