महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आजपासून प्रो-कबड्डीच्या महापर्वाला सुरुवात, तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना - umumba telugu titans

तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. तर पाटणा पायरेट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात होणारा सामना 8.30 वाजता सुरु होईल.

आजपासून प्रो-कबड्डीच्या महापर्वाला सुरुवात, तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना

By

Published : Jul 20, 2019, 8:17 AM IST

Updated : Jul 20, 2019, 11:02 AM IST

हैदराबाद -आजपासून प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वाला सुरुवात होणार असून एकूण 12 संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत. आजचा सलामीचा सामना तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या गचीबोली इंडोर स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडतील. तर दुसरा सामना पाटणा पायरेट्स विरुद्ध गतविजेते बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे.

तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यातील सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होईल. तर पाटणा पायरेट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात होणारा सामना 8.30 वाजता सुरु होईल. यंदाच्या हंगामात सर्व सामने रॉबिन राऊंड पद्धतीने खेळवण्यात येणार असून प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत.

यंदाच्या हंगामात एकूण 137 सामने होणार आहेत. चाहत्यांना आता पुढील 75 दिवस कबड्डीची मेजवानी मिळणार आहे. मागच्या वर्षी यू मुंबा कडून खेळलेल्या आणि नवीन खेळाडू म्हणून नावारुपास आलेला सिद्धार्थ देसाई यंदा तेलगू टायटन्स कडून खेळणार आहे. त्यामुळे यू मुंबाचा संघ सिद्धार्थवरुद्ध काय रणनिती आखतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तेलूगू टायटन्सचा संघ आपल्या घरच्या मैदानावर चार सामने खेळणार असून, पहिला सामना यु मुंबा, तर रविवारी दुसरा सामना तामिळ थलायवास विरुद्ध खेळेल. दोन दिवसानंतर दबंग दिल्ली आणि शेवटचा सामना पाटणा पायरेट्स विरुद्ध खेळेल.

Last Updated : Jul 20, 2019, 11:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details