महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सेव्हन स्टार वाळपईच्या संघाने जिंकला अखिल गोवा कबड्डी पोलीस चषक - गोवा पोलीस

ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर १० आणि ११ सप्टेंबर या दोन दिवशी ही स्पर्धा खेळविण्यात आली. यामध्ये राज्यातील अठरा संघानी सहभाग घेतला होता. आज स्पर्धेची अंतिम फेरी खेळविण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर, पोलिस महासंचालक प्रणव नंदा, विश्वजीत क्रूष्णा राणे आदी उपस्थित होते.

सेव्हन स्टार वाळपईच्या संघाने जिंकला अखिल गोवा कबड्डी पोलीस चषक

By

Published : Sep 11, 2019, 9:11 PM IST

पणजी - पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये मैत्री आणि विश्वासाचे नाते अधिक प्रमाणात विकसित व्हावे, यासाठी गोवा पोलिसांतर्फे अखिल गोवा कबड्डी पोलिस चषक-२०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोवा पोलीस संघाचा ४८-४१ असा पराभव करत वाळपईच्या सेव्हन स्टार संघाने विजेतेपद पटकावले.

ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर १० आणि ११ सप्टेंबर या दोन दिवशी ही स्पर्धा खेळविण्यात आली. यामध्ये राज्यातील अठरा संघानी सहभाग घेतला होता. आज स्पर्धेची अंतिम फेरी खेळविण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर, पोलिस महासंचालक प्रणव नंदा, विश्वजीत क्रूष्णा राणे आदी उपस्थित होते.

सेव्हन स्टार वाळपई विरुध्द गोवा पोलीस यांच्यात रंगलेला सामना...

गोवा पोलीस आणि सेव्हन स्टार संघामधील विजेतेपदाची लढत खूपच रोमहर्षक झाली. पहिल्या सत्रात २५-१३ अशा अशा स्थितीत असूनही गोवा पोलीस संघाने दुसऱ्या सत्रात जोरदार टक्कर देत गुण फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाळपई संघाने शेवटपर्यंत सांघिक एकता कायम राखत ४८-४१ अशा फरकाने सामना जिंकत 'अखिल गोवा कबड्डी पोलीस चषका'चे पहिले मानकरी ठरले.

सामन्यात अनेक वेळा पंचाशी हुज्जत घातल्यामुळे वाळपईच्या एका खेळाडुला 'ग्रीन कार्ड' दाखविण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्या तर क्रीडा मंत्री आजगावकर यांच्या हस्ते उपविजेत्या संघाला चषक प्रदान करण्यात आला.
कुंकळ्ळी वॉरियर्स तिसऱ्या तर तिसवाडी कबड्डी संघ चौथ्या स्थानी राहिले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट पकडीसाठी जाफर (वास्को), उत्कृष्ट चढाईपटू म्हणून विशाल राठोड (सेव्हन स्टार वाळपई) आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून लक्ष्मण सावळदेसाई (गोवा पोलिस) यांची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'खेळातील राजकारण बंद झाले पाहिजे. जोपर्यंत ते बंद होत नाही, तो पर्यंत खेळाची प्रगती आणि योग्य खेळाडूंना संधी मिळणार नाही. युवकांना खेळामध्ये संधी मिळाली पाहिजे. परंतु, केवळ सरकारने कबड्डीला प्रोत्साहन देऊ काही होणार नाही. यासाठी अनेक संघटनानी पुढाकार घेतला पाहिजे.'

ABOUT THE AUTHOR

...view details