महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ODI World Cup 2023: गौतम गंभीरने एकदिवसीय विश्वचषकाबाबत केले मोठे विधान, म्हणाला- 'रोहित, कोहलीसारखे सीनियर...

ODI World Cup 2023: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) विश्वास आहे (Team India ) की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावतील.

ODI World Cup 2023
गौतम गंभीर

By

Published : Jan 4, 2023, 5:55 PM IST

नवी दिल्ली: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (ODI World Cup 2023) या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या (Team India) एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्मा आणि (Gautam Gambhir ) विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंची महत्त्वाची भूमिका असणार, असे मत व्यक्त केले आहे. (ODI World Cup) भारताला निडर खेळाडू ओळखण्याची गरज असल्याचे गंभीर यावेळी म्हणाला आहे.

'रोड टू वर्ल्ड कप ग्लोरी' या स्टार स्पोर्ट्स शोमध्ये तो म्हणाला (Rohit Sharma ) की, "सर्वप्रथम तुम्ही अशा खेळाडूंना ओळखले पाहिजे जे निडर क्रिकेट खेळतात. (Virat Kohli ) तुम्हाला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्व प्रकारचे क्रिकेटपटू हवे आहेत. तसेच असे खेळाडू जे डावाचे सूत्रधार बनू शकणार आहे. मला विश्वास आहे की, विराट कोहली, रोहित शर्मासारखे खेळाडू ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतात. तो फिरकीला चांगला खेळू शकतो आणि आगामी विश्वचषकात त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकणार आहे.

क्रिकेटमधून राजकारणात आलेल्या गंभीरने सांगितले की, दोन्ही टोकांकडून दोन नवीन चेंडू आणल्यामुळे एकदिवसीय क्रिकेटचे स्वरूप बदलले आहे. तो म्हणाला की, आमच्या काळात एकच नवीन चेंडू असायचा, पण आता दोन नवीन चेंडू आहेत. अशा स्थितीत अनियमित गोलंदाजांची भूमिका नव्हती. आता रिव्हर्स स्विंगही दिसत नाही. आता अशा खेळाडूंची गरज आहे, जे या परिस्थितीत चमकदार खेळ करू शकणार आहेत.

गौतम गंभीर पुढे म्हणाला की, भारताला खेळाडू ओळखावे लागतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे.भारतीय क्रिकेटने गेल्या दोन विश्वचषकांमध्ये तीच चूक केली, या खेळाडूंनी एकत्र जास्त क्रिकेट खेळले नाही. आम्ही किती वेळा सर्वोत्तम इलेव्हनला मैदानात उतरवण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही ते करू शकलो नाही आणि आतापर्यंतची सर्वोत्तम इलेव्हन मैदानात उतरली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) विश्वास आहे (Team India ) की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावतील.

ABOUT THE AUTHOR

...view details