मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू देशभरातील लोकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. 24 जुलै रोजी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात पदक जिंकत भारताचे पदकाचे खाते उघडले. चानू टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू आहे.
आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ आहे एका चिमूकलीचा. ज्यात चिमुकली वेटलिफ्टिंग करताना पाहायला मिळत आहे. तर तिच्या पाठीमागे टीव्हीवर मीराबाई चानूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेला सामना सुरू असल्याचे दिसत आहे.
चिमुकली ही वेटलिफ्टर सतिश यांची मुलगी आहे. ती मीराबाई चानूला पाहून चानूसारखी वेटलिफ्टिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रौप्य पदक विजेती मीराबाई चानूची प्रतिक्रिया -
गोड चिमुकलीने केलेली वेटलिफ्टिंग पाहून रौप्य पदक विजेती मीराबाई चानूने देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने, सो क्यू, जस्ट लव्ह धिस, असे म्हटलं आहे.