मेलबर्न:भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा (Indian tennis legend Sania Mirza) मंगळवारी म्हणाली की, तिला डब्ल्यूटीए टेनिस 2022 सीजनच्या शेवटी निवृती घेतल्याचा निर्णय जाहीर केल्याचा आता पश्चाताप होत आहे.
सानिया मिर्झाने मागच्या बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) महिला दुहेरीत पहिल्या फेरीतील पराभवानंतर आपल्या निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये तिची मोहीम मंगळवारी मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाली. कारण त्यांची जोडी 1 तास 30 पर्यंत चालल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन जेमी फोरलिस आणि जेसन कुबलर यांच्याकडून 4-6, 6-7 अशा फरकाने पराभूत झाली.