नवी दिल्ली:भारताची प्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला (Tennis player Sania Mirza) ऑस्ट्रलिया ओपन 2022 मध्ये (Australian Open 2022) महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर बुधवारी सानिया मिर्झाने आपली निवृती जाहीर केली आहे. पराभवानंतर सानिया मिर्झाने सांगितले की, 2022 हे वर्ष तिच्या दौऱ्यातील शेवटचे हंगाम असेल आणि तिला खरोखर ते पूर्ण करायचे आहे.
Tennis player Sania Mirza: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा - सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा
महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी निवृती जाहीर केली (Sania Mirza announces retirement) आहे.
सानिया मिर्झा म्हणाली, मी ठरवले आहे की हा माझा शेवटचा सीझन असेल. मी आठवडा दर आठवडा मोजत आहे. मला खात्री नाही की मी या हंगामात टिकू शकेन की नाही, परंतु मला ते करायचे आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत सानिया मिर्झा बुधवारी पहिल्या फेरीतील सामना गमावून बाहेर पडली.
सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान या स्लाव्होनिक जोडीकडून एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) ने पराभव स्विकारावा लागला.