नवी दिल्ली -भारतीय खेल प्राधिकरणाने (एसएआय) दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर पुन्हा क्रीडा उपक्रम सुरू केले आहेत. विविध स्टेडियममधील 50 टक्के सुविधा कार्यान्वित केल्या पाहिजेत, असा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता.
विशेष म्हणजे कोरोनामुळे 14 मार्चपासून स्टेडियमवरील सराव बंद करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने अटींच्या आधारावर क्रीडा स्टेडियममध्ये सराव सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर खेळ सुरू करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने एसओपीची घोषणा केली.