नवी दिल्ली - भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) सर्व संस्थांना वर्षातून दोनदा त्यांच्या प्रशिक्षकांची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास सांगितले आहे. शिवाय, या चाचण्यांची नोंदही ठेवण्यास सांगितले गेले आहे. फिटनेस टेस्ट प्रोटोकॉलनुसार, सर्व प्रशिक्षकांना विविध चाचण्यामंधून जावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबर रोजीसुरू केलेल्या फिटनेस प्रोटोकॉलन्वये, वयानुसार आणि योग्यतेनुसार ही चाचणी घेण्यात येईल. क्रीडा प्राधिकरण हे प्रामुख्याने तज्ञ प्रशिक्षकांच्या मदतीने खेळाडूंना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. प्रशिक्षकांचा फिटनेस त्यांना मैदानावर प्रशिक्षण देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे.