महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चक्क क्रिकेटच्या देवाचाही डीपफेक व्हिडिओ; सचिननं दिलं स्पष्टीकरण

Sachin Tendulkar AI Video : माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो एका गेमची जाहिरात करताना दिसत आहे.

Sachin Tendulkar AI Vide
सचिन तेंडुलकर एआय व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 3:46 PM IST

Updated : Jan 15, 2024, 5:15 PM IST

मुंबई Sachin Tendulkar AI Video : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर अनेक अभिनेत्रींचे व्हिडिओही सोशल मीडियावर डीपफेकद्वारे व्हायरल होऊ लागले होते. याशिवाय यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा देखील गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, आता माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरबाबतही असंच काही घडलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं सचिनचा व्हि़डिओ तयार करण्यात आलाय. सचिनच्या आवाजात एका गेमचं प्रमोशन होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये सचिनच्या आवाजात गेमचं प्रमोशन करताना म्हटलं आहे की, 'माझी मुलगीही हा गेम खेळते. या गेमबद्दल अनेकजण आता बोलताना दिसत आहेत. माझी मुलगी या गेमद्वारे खूप पैसे कमवत आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, चांगले पैसे कमावणं खूप सोपं आहे.' याशिवाय या प्रमोशनल अ‍ॅडमध्ये हा गेम फ्री असल्याचं सांगण्यात आलंय. सचिन तेंडुलकरची ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकजण धक्क झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळं क्रिकेटरची झोप उडाली आहे.

सचिन तेंडुलकरचं स्पष्टीकरण : हा व्हिडिओ 'एक्स'वर पोस्ट करताना सचिननं म्हटलं, 'हा व्हिडिओ बनावट असून, तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, असे व्हिडिओ किंवा अ‍ॅप्सची जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा.'

सचिन तेंडुलकरच्या पोस्टवर चाहत्यांची कमेंट्स : पुढं सचिननं म्हटलं, 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा बसावा आणि डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आहे.' सचिनच्या या व्हिडिओवर आता अनेकजण कमेंट्स करून त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, ''सचिन सर असे अनेक व्हिडिओ रोज व्हायरल होत आहे, मात्र यावर कोणीही काही करू शकत नाही.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''कोणाचाही असा डीपफेक व्हिडिओ बनवणं खूप भयानक आहे.''

हेही वाचा :

  1. दीपिका स्टारर 'फायटर'चा ट्रेलर रिलीज, पुलवामासह बालाकोटचाही आहे उल्लेख
  2. बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा सुशांतसिंगचा उल्लेख, विकीनं 'ती' आठवण सांगून अंकिताला विचारले प्रश्न
  3. मालदीवला जाऊन शुटिंग करणं थांबवा, सिनेवर्कर्सचं असोसिएशनचं चित्रपट निर्मात्यांना आवाहन
Last Updated : Jan 15, 2024, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details