मुंबई : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 24 एप्रिल रोजी 50 वर्षांचा होणार आहे. शनिवार 22 एप्रिलपासून त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मास्टर ब्लास्टरची जादू पसरली आहे. या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान दिग्गज क्रिकेटपटूचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याच मैदानात सचिन तेंडुलकरने केक कापून आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.
सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस :24 एप्रिलला सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस आहे. पण त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन शनिवारी 22 एप्रिल रोजी त्याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामन्यादरम्यान झाले. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा वाढदिवस दोन दिवस अगोदर साजरा करण्यात आला. यावेळी सचिन म्हणाला की, ५० वर्षे पूर्ण करणे हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक होते.
चाहत्यांना तेंडुलकरच्या चेहऱ्याचा मास्क : पंजाब किंग्जच्या फलंदाजीच्या दुसऱ्या मोक्याच्या ब्रेकमध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या डगआऊटजवळ केक कापला. हा कार्यक्रम मुंबई इंडियन्स संघाने आयोजित केला होता. तेंडुलकरने २००८ ते २०१३ या कालावधीत आयपीएलमध्ये या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. खेळाला अलविदा केल्यानंतरही तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. यावेळी वानखेडे स्टेडियमवर ३० हजारांहून अधिक चाहत्यांना तेंडुलकरच्या चेहऱ्याचा मास्क देण्यात आला. या अनुभवी फलंदाजाने भारत आणि मुंबई इंडियन्सची 10 क्रमांकाची जर्सी घातली. पंजाब किंग्जच्या डावातील 10व्या षटकानंतर स्टेडियम 'सचिन...सचिन'च्या घोषणांनी दुमदुमून गेले. गरवारे पॅव्हेलियनच्या बाहेर, चाहत्यांना फोटो क्लिक करण्यासाठी सचिनच्या 10 क्रमांकाच्या जर्सीची मोठी प्रतिकृती ठेवण्यात आली होती.
खेळाडूची गौरवशाली कारकीर्द : मुंबई फ्रँचायझीने यापूर्वी एका प्रकाशनात म्हटले होते की, 'सचिनने क्रिकेटमध्ये 10 क्रमांकाची जर्सी आयकॉनिक बनवली आहे. भारतासाठी खेळलेल्या त्याच्या शेवटच्या सामन्यालाही 10 वर्षे पूर्ण होत आहेत. तो सामनाही वानखेडे स्टेडियमवर झाला होता. यानिमित्ताने शनिवारी भारतासाठी सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूची गौरवशाली कारकीर्द साजरी करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Sachin Tendulkar Fan: सचिनप्रेमी गोळा विक्रेत्याने राज्याच्या भावी मुख्यमंत्री पदासाठी सुरू केली जनमोहीम; वाचा 'हा' खास रिपोर्ट