बेलग्रेड - सर्बिया येथे झालेल्या वैयक्तिक वर्ल्डकपच्या फ्री स्टाईल प्रकारात रशियन कुस्तीपटूंनी चार सुवर्णपदके जिंकली आहेत. २०१९ चा २३ वर्षांखालील चॅम्पियन रजाम्बेक झमालोवने ७४ किलोग्राम फ्रीस्टाईलच्या अंतिम सामन्यात इटलीच्या फ्रँक चामिजोचा ४-२ असा पराभव केला. चामिजोने दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे.
कुस्ती : वर्ल्डकपमध्ये रशियाला चार सुवर्णपदके - रशिया कुस्ती सुवर्णपदक २०२०
झमालोवव्यतिरिक्त, जवुर उगेव्हने ५७ किलो गटात सुवर्ण, अलीखान झबरैलोवने ९२ किलो गटात, तर १२५ किलो गटात शामिल शारिपोव्हने सुवर्णपदक जिंकले आहे. रशियाशिवाय पोलंडचा मेगोमेद्माराड गेडझिएव्ह देखील सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला.
कुस्ती : वर्ल्डकपमध्ये रशियाला चार सुवर्णपदके
हेही वाचा -मेस्सी-रोनाल्डोचा पाडाव करत लेवंडोवस्कीने पटकावला सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार
झमालोवव्यतिरिक्त, जवुर उगेव्हने ५७ किलो गटात सुवर्ण, अलीखान झबरैलोवने ९२ किलो गटात, तर १२५ किलो गटात शामिल शारिपोव्हने सुवर्णपदक जिंकले आहे. रशियाशिवाय पोलंडचा मेगोमेद्माराड गेडझिएव्ह देखील सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला. या कुस्तीपटूने ७० किलो गटामध्ये तुर्कीच्या हैदर यावुझचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.