महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Drag-flicker Rupinder Pal Singh : ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंग दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर - प्रशिक्षक बीजे करिअप्पा

20 जणांच्या संघाचा कर्णधार बनलेल्या रुपिंदरला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली. रूपिंदरच्या जागी अनुभवी बचावपटू बिरेंदर लाक्रा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार ( Birender Lakra take over the captaincy ) आहे. त्याच्या जागी बचावपटू नीलम संजीव जेस या स्पर्धेसाठी खेळणार आहे.

Rupinder Pal Singh
Rupinder Pal Singh

By

Published : May 13, 2022, 10:39 PM IST

बंगळुरू:अनुभवी ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंग दुखापतीमुळे ( Drag-flicker Rupinder Pal Singh injured ) जकार्ता येथे २३ मे पासून सुरू होणाऱ्या आशिया कपमधून बाहेर पडला आहे. 20 जणांच्या संघाचा कर्णधार बनलेल्या रुपिंदरला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली. त्याच्या जागी बचावपटू नीलम संजीव जेस ( Defender Neelam Sanjeev Jess ) या स्पर्धेसाठी खेळणार आहे. रुपिंदरच्या जागी अनुभवी बचावपटू बिरेंदर लाक्रा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल, तर फॉरवर्ड एसव्ही सुनील संघाचा उपकर्णधार असेल.

प्रशिक्षक बीजे करिअप्पा ( Coach BJ Kariappa ) म्हणाले, "सराव सत्रादरम्यान रुपिंदरला दुखापत ( Rupinder injured during practice session ) झाली आणि तो आशिया कपमधून बाहेर पडला हे दुर्दैवी आहे. बिरेंदर आणि सुनील दोघेही अत्यंत अनुभवी आहेत आणि अनेक वर्षांपासून नेतृत्व गटाचा भाग आहेत. आम्हाला रुपिंदरची उणीव भासणार असली तरी आमच्याकडे संघात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आमच्याकडे खेळाडूंचा एक अतिशय प्रतिभावान गट आहे आणि ते या संधीचा फायदा घेण्यासाठी उत्सुक आहेत.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे -

गोलरक्षक: पंकज कुमार रजक आणि सूरज कारकेरा.

बचावपटू:यशदीप सिवाच, अभिषेक लाक्रा, बिरेंदर लाक्रा (कर्णधार), मनजीत आणि दीपसन तिर्की.

मिडफिल्डर: विष्णुकांत सिंग, राज कुमार पाल, मारिसवरेन शक्तीवेल, शेष गौडा बीएम आणि सिमरनजीत सिंग.

फॉरवर्ड:पवन राजभर, भरण सुदेव, एसव्ही सुनील (उपकर्णधार), उत्तम सिंग, एस. कार्ती आणि नीलम संजीव.

हेही वाचा -IPL 2022 Mystery Girl : मुंबई आणि चेन्नई सामन्यादरम्यानचा 'या' तरुणीचा फोटो होतोय व्हायरल, नाव जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये आतुरता

ABOUT THE AUTHOR

...view details