नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता या आयपीएल 2023 मध्ये नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्या उपस्थितीत आरसीबीसाठी संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. आरसीबीच्या या नवीन जर्सीसह, सर्व खेळाडूंचा नवा लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या हंगामात, आरबीसी संपूर्ण बदलांसह आणि पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.
आरसीबीची पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची तयारी :आयपीएलआधीच सर्व फ्रँचायझींचे खेळाडू त्यांच्या संघात सामील झाले आहेत आणि काही संघ सामील होत आहेत. यावेळी आरसीबीने पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिससह आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली यांनी नवीन जर्सी लाँच केली. आरसीबी आयपीएलमधील पहिल्या विजेतेपदासाठी लढणार आहे. त्याच वेळी, आरसीबीची नवीन जर्सी पाहून चाहते खूप आकर्षित होत आहेत.