नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने बुधवारी स्वतःचा एक फोटो शेअर करून त्याच्या रिकव्हरीची माहिती दिली आहे. तो लवकर बरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. कार अपघातात जखमी झाल्यानंतर तो सावरण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना आशा आहे की, तो लवकरच फिट होईल आणि मैदानावर खेळताना दिसेल. फलंदाज ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर आपल्या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'खेळ चारित्र्य घडवत नाही, ते 'ते' प्रकट करतात. म्हणजे खेळ हे चारित्र्य निर्माण करत नाहीत तर ते प्रकट करण्याचे साधन आहेत.
ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया :ऋषभ पंत हा उत्तराखंडमधील त्यांच्या घरी जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. तिथल्या लोकांनी ऋषभ पंतला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचे प्राण वाचवले. या अपघातात ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेला दोन महिने उलटूनही पंत अजूनही आधार घेऊन चालत आहेत. त्याच्यावर सध्या फिजिओथेरपी सुरू आहे, ज्यामुळे त्याला पुढील काही महिन्यांत चालायला मदत होईल.