मोहाली - अनुभवी प्रशासक आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सुपुत्र रणइंदर सिंग हे चौथ्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्षपद बनले. विशेष बाब म्हणजे आजच अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे रणइंदर सिंग यांनी निवडणूक जिंकली. रणइंदर सिंग यांनी मोहालीत झालेल्या निवडणूकीत बसपाचे खासदार श्याम सिंह यादव यांचा 56-3 अशा फरकाने एकतर्फा पराभव केला. कुंवर सुल्लान यांना बिनविरोध महासचिव म्हणून निवडण्यात आले. तर रणदीप मान यांची कोषाध्यपदी वर्णी लागली.
ओडिशाचे खासदार कलीकेश नारायण सिंह देव महासंघाच्या 8 उपाध्यक्षांशिवाय अनुभवी उपाध्यक्ष म्हणून राहतील. पवन कुमार सिंह देखील शेला कानुंगो यांच्यासोबत महासंघाचे संयुक्तपणे सचिव म्हणून काम पाहतील. एनआरएआयने दिल्ली उच्च न्यायालयात यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर क्रीडा मंत्रालयाने निवडणूक प्रक्रिया घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. यादव हे उत्तर प्रदेशच्या जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे खासदार आहे.
एनआरएआयने निवडणूक निर्धारित वेळेत घेण्याचा निर्णय यासाठी कायम राखला की, उच्च न्यायालयाकडून यावर कोणताही स्टे ऑर्डर मिळाला नव्हता. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये पार पडली.