सातारा:'महाराष्ट्र केसरी' ( Maharashtra Kesar ) विजेत्या कुस्तिगीरांना फक्त पदक देऊन भागणार नाही. त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढील पिढीला होण्यासाठी त्यांना एखादं पद द्यावं, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ( Ramraje Naik Nimbalkar's demand ) व्यक्त केली. छत्रपती शाहू स्टेडियमच्या संकुलामध्ये 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, राज्य कुस्तीगीर परिषदेचे समन्वयक ललित लांडगे,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.
शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मिळून या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हातभार लावूया. कुस्तीत सातारचं नाव उंचावेल असं काम उभं करु या, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील ( Guardian Minister Balasaheb Patil ), तालीम संघाचे साहेबराव पवार, कुस्तीगीर परिषदेचे समन्वयक ललित लांडगे यांची भाषणे झाली. सातारा जिल्हा तालीम संघाचे निमंत्रक दिपक पवार यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक सुधीर पवार यांनी सूत्रसंचालन केले.