महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'सुवर्णकन्या' हिमा दासचे राष्ट्रपती कोंविद, पंतप्रधान मोदींनीे केले अभिनंदन - pm narendra modi

'हिमा दासने मागील काही दिवसात केलेल्या कामगिरीवर संपूर्ण भारतीयांना गर्व आहे. हिमाने वेगवेगळ्या स्पर्धेत 5 सुवर्णपदके जिंकल्याने प्रत्येक भारतीय तिच्या कामगिरीवर खूश आहे. या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा'. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

'सुवर्णकन्या' हिमा दासचे राष्ट्रपती कोंविद, पंतप्रधान मोदींनीे केले अभिनंदन

By

Published : Jul 21, 2019, 9:57 PM IST

Updated : Jul 21, 2019, 11:36 PM IST

नवी दिल्ली- गेल्या 19 दिवसात भारताची स्टार धावपटू हिमा दास हिने तब्बल ५ सुवर्णपदके जिंकली. यामुळे हिमा दास हिचे जगभरातून कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून हिमा दासचे अभिनंदन केले.

'तीन आठवड्यात पाच सुवर्णपदके जिंकणाऱ्या हिमा दासचे अभिनंदन. तु अद्भूत आहेस, अशीच कामगिरी करत रहा'. अशा आशयाचे ट्विट राष्ट्रपती कोविंद यांनी केले आहे.

'हिमा दासने मागील काही दिवसात केलेल्या कामगिरीवर संपूर्ण भारतीयांना गर्व आहे. हिमाने वेगवेगळ्या स्पर्धेत 5 सुवर्णपदके जिंकल्याने प्रत्येक भारतीय तिच्या कामगिरीवर खूश आहे. या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा'. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

हिमा दास हिने एका महिन्यात तब्बल 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. तिने 2 जुलै रोजी युरोपमध्ये, 5 जुलैला कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, 13 जुलैला चेक प्रजासत्ताकमध्ये, 17 जुलैला टाबोर ग्रां प्री मध्ये धावण्याच्या वेगवेगळ्या प्रकारात ही सुवर्णपदके जिंकली आहेत.

Last Updated : Jul 21, 2019, 11:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details