महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Rameez Raja : आशिया कप पाकिस्तानमधून बाहेर नेला तर पाकिस्तान स्पर्धेत खेळणार नाही : रमीझ राजा

आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर आयोजित केल्यास आपण त्यात सहभागी ( Pakistan will Not Play If ACC Decides to Shift Asia Cup ) होणार नाही, असा इशारा रमीझ राजा ( Rameez Raja ) यांनी दिला ( Chairman Rameez Raja Said Pakistan will Not Play Asia Cup ) आहे. भारताला येथे दौरा करायचा नसल्यामुळे पाकिस्तानामधील आशिया चषक देशाबाहेर नेता येणार ( Jai Shah ) नाही. जर आशिया कप बोर्डाने असे केले, तर आम्ही या स्पर्धेतून बाहेर पडू, आम्ही स्पर्धा खेळणार नाही. असा इशाराच रमीझ राजा यांनी दिला आहे.

PCB Chairman Rameez Raja
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा

By

Published : Dec 3, 2022, 2:48 PM IST

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक ( Asia Cup 2023 ) स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्यास ( Pakistan will Not Play If ACC Decides to Shift Asia Cup ) पाकिस्तान आशिया चषक खेळणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा ( PCB Chairman Rameez Raja ) यांनी ( Chairman Rameez Raja Said Pakistan will Not Play Asia Cup ) सांगितले. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह ( Jai Shah ) यांनी सांगितले होते की, भारत पुढील वर्षी आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. त्यानंतर पीसीबीने भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची धमकी दिली होती.

आशिया कप स्पर्धा जर पाकिस्तान बाहेर नेल्यास पाकिस्तान आशिया कपमध्ये नसेल :इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रमीझने सांगितले की, भारताला येथे दौरा करायचा नसल्यामुळे पाकिस्तानामधील आशिया चषक देशाबाहेर नेता येणार नाही. जर आशिया कप बोर्डाने असे केले, तर आम्ही या स्पर्धेतून बाहेर पडू, आम्ही स्पर्धा खेळणार नाही. तो म्हणाला, "जर भारत पाकिस्तानमध्ये येऊ शकत नसेल, तर आमच्याकडे आशिया कपमध्ये न खेळण्याचा पर्याय आहे." आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता.

भारताने या स्पर्धेतून बाहेर पडावे, परंतु आशिया कप स्पर्धा बाहेर जाणार नाही :भारताने कोणत्याही कारणास्तव पाकिस्तान दौरा टाळला, तर पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान भारत दौरा करणार नाही, अशी धमकी रमीझने यापूर्वी दिली होती. ते म्हणाले की, सर्व मोठे संघ पाकिस्तानला भेट देत असून, त्यांना सुरक्षा देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान दौऱ्यावर न येण्यामागे भारतीय संघाकडे ठोस कारण नाही. तो म्हणाला, 'मला माहिती नाही की भारत येईल की नाही, पण आम्हाला टुर्नामेंट पाकिस्तानमधून हलवायची नाही. असे झाल्यास, आम्ही कार्यक्रमातून पूर्णपणे माघार घेण्याचा विचार करू.

ABOUT THE AUTHOR

...view details