न्यूयॉर्क: टेनिसपटू राफेल नदालने ( Rafel Nadal ) एकतर्फी लढतीत फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटचा 6.0, 6.1 आणि 7.5असा पराभव करून ( Rafel Nadal Defeated Richard Gasquet ) यूएस ओपनची चौथी फेरी गाठली ( Rafael Nadal enters fourth round US Open ) आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल ( Tennis Player Rafel Nadal ) दुसऱ्या फेरीतील विजयादरम्यान त्याच्याच रॅकेटच्या नाकाला मार लागल्याने जखमी झाला होता, मात्र आता राफेल नदाल म्हणतो की त्याच्या नाकाची दुखापत पूर्वीपेक्षा बरी झाली आहे. राफेल नदालने चार वेळा विजेतेपद आणि 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. आता पुढील फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोशी होणार आहे.
दुसरीकडे, आंद्रेई रुबलेव्हने चार तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या डेनिस शापोवालोव्हचा ( Denis Shapovalov ) 6.4, 2.6, 7.6, 6.4 आणि 7.0 असा पराभव केला. आता पुढील फेरीत त्याचा सामना सातव्या क्रमांकाच्या कॅमेरून नॉरीशी होणार आहे. याशिवाय कार्लोस अल्कारेझ ( Carlos Alcarez ) हा पीट सॅम्प्रासनंतर सलग दुसऱ्या यूएस ओपनमध्ये चौथी फेरी गाठणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. सॅम्प्रासने हा पराक्रम 1989 आणि 1990 मध्ये केला होता. 19 वर्षीय अल्कारेझने जेन्सन ब्रूक्सबीचा 6.3, 6.3 आणि 6.3 ने पराभव केला.