लंडन : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल ( Spanish tennis legend Rafael Nadal ) याने रॉजर फेडररच्या निवृत्तीवर एक भावनिक ट्विट केले ( Nadal emotional tweet on Roger Federer retirement ) आहे. नदालने ट्विटरवर लिहिले, “प्रिय रॉजर, माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी, हा दिवस कधीही येऊ नये अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी आणि खेळासाठी हा दुःखद दिवस आहे. कोर्ट इतकी वर्षे तुझ्यासोबत शेअर करणे हा केवळ आनंदच नाही तर माझ्यासाठी सन्मान राहिला आहे.
स्विस टेनिस स्टार रॉजर फेडररने 15 सप्टेंबर रोजी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा ( Roger Federer retirement from professional tennis ) केली. तसेच पुढील आठवड्यात लंडनमधील लेव्हर कप ही त्याची "विदाई स्पर्धा" असेल असे सांगितले. फेडररने वयाच्या 41 व्या वर्षी टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकणारा फेडरर जुलै 2021 मध्ये विम्बल्डनमध्ये खेळल्यापासून कोर्टवर हजर झालेला नाही. यानंतर त्याच्या गुडघ्याच्या अनेक शस्त्रक्रिया झाल्या.