चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधा( Indian young Grandmaster R. Pragnananda ) याने ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या एअरथिंग्स मास्टर्सच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून मोठा धक्का ( Magnus Carlson defeated by Pragnananda ) दिला. सोमवारी सकाळी खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रग्नानंदने कार्लसनचा 39 चालींमध्ये पराभव केला. त्यानंतर आता प्रज्ञानंधाच्या शाळेच्या प्राचार्यानी त्याचे कौतुक केली आहे.
Online Rapid Chess Tournament : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधाचे त्याच्या प्राचार्यांने केले कौतुक - वेलामल शाळेचे प्राचार्य के.एस. पोनमठी
16 वर्षीय प्रज्ञानंधाने ( 16 year old Pragnanandan ) ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या एअरथिंग्ज मास्टर्सच्या 8व्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव ( Pragnanandha defeated Magnus Carlson ) केला आहे. आता त्याच्या या विजयाचे कौतुक त्याच्या शाळेच्या प्राचार्याने केले.
16 वर्षीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंधाने ऑनलाइन आयोजित एअरथिंग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्याच्या आठव्या फेरीत विद्यमान विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवला होता. त्याच्या या यशाबद्दल बोलताना त्याच्या शाळेचे म्हणजे वेलामल शाळेचे प्राचार्य के.एस. पोनमठी ( Velamal school principal K.S. Ponmathi ) म्हणाले, या यशाबद्दल आम्ही प्रज्ञानंधाचे अभिनंदन करतो. आम्ही क्रीडा आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांच्या विकासासाठी पूर्ण पाठिंबा देत आहोत.
एअरथिंग्स मास्टर्समध्ये 16 खेळाडू सहभागी (16 players participate in Aarthings Masters ) आहेत. यामध्ये, खेळाडूला विजयासाठी तीन गुण आणि ड्रॉसाठी एक गुण मिळतो. प्राथमिक टप्प्यात आता सात फेऱ्यांची डाव अजून खेळले जायचे आहेत.