बासेल (स्वित्झर्लंड): स्विस ओपनचा फायनल सामना ( Final of Swiss Open ) पीव्ही सिंधू विरुद्ध बुसानन ओंगबामरुंगफान ( PV Sindhu vs Busanan Ongbamarungphan ) यांच्यात पार पडला. भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने स्विस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 7व्या स्थानी असलेल्या सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 21-16, 21-8 असा सलग गेममध्ये पराभव केला. सिंधूने प्रथमच स्विस ओपन सुपर 300 चे विजेतेपद पटकावले ( Sindhu wins Swiss Open Super 300 ) आहे. पूर्वार्धात थायलंडच्या खेळाडूने दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला टक्कर दिली. परंतु दुसऱ्या गेममध्ये सिद्धूने ओंगबामरुंगफनला कोणतीच संधी दिली नाही.
पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. एक वेळीस सामना 13-13 असा बरोबरीत होता. यानंतर सिंधूने सलग तीन गुण मिळवत आघाडी घेतली. बुसाननने पुनरागमन करत 18-16 अशी बरोबरी साधली, पण त्यानंतर सलग तीन गुण घेत सिंधूने 21-16 अशा फरकाने गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने बुसाननला कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही. एकेकाळी भारतीय महिला खेळाडू 20-4 अशा फरकाने पुढे होती.