नवी दिल्ली - दलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खलीने आता कुस्तीपटूतून (Professional wrestler Dalip Singh Rana ) राजकीय मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. कुस्तीपटू द ग्रेट खली गुरुवारी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाला होता. जिथे त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर खलीने आता भाजप पक्षाचे काम करताना दिसेल.
The Great Khali: कुस्तीपटू द ग्रेट खलीचा भाजप पक्षात प्रवेश - joins BJP in Delhi
कुस्तीपटू द ग्रेट खली (Also known as The Great Khali ) गुरुवारी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाला होता. जिथे त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
The Great Khali
रेसलर द ग्रेट खली (Wrestler The Great Khali) म्हणाला, मला भाजपमध्ये सामील होताना आनंद होत आहे. माझ्या मते पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम त्यांना योग्य पंतप्रधान बनवते. त्यामुळे देशाच्या विकासासाठी त्यांच्या राजवटीचा एक भाग का होऊ नये, असे मला वाटले. भाजपच्या राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी भाजपमध्ये सामील झालो.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अगोदर खलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने भाजपची ताकद अजून वाढणार आहे.